पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसमाजकारण

शर्वरी विंडगेट्स मध्ये विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण…

भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी येथील शर्वरी विंडगेट्स पुनावळे मध्ये एक वेगळ्या अर्थपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोसायटीच्या आवारात झालेल्या ध्वजारोहण समारंभात विधवा महिलांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
पुनावळे I झुंज न्यूज :  कार्यक्रमामागे एक महत्त्वाचा सामाजिक संदेश होता – समाजातील विधवा महिलांनाही समान आदर, संधी आणि सहभाग मिळायला हवा. त्यांच्याही हातून राष्ट्रध्वज फडकवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा हा प्रयत्न होता.

सकाळी ८.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सोसायटीचे सचिव सौ. प्रमोदिनी सुहास लांडगे, व्यवस्थापक आणि सर्व सदस्य उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छोट्या मुलांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण जाधव यांनी केले.

“हा फक्त ध्वजारोहण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान देण्याचा संकल्प आहे. विधवा बहिणींनी आज तिरंगा फडकवला, यातून आम्ही सर्वांना संदेश देत आहोत की – प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे,” असे सोसायटीच्या सचिव यांनी भावपूर्ण शब्दांत सांगितले.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. असे सर्जनशील आणि संवेदनशील कार्यक्रम समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात, अशी भावना व्यक्त केली जात आहे.यावेळी विनोद बिरादार, अश्विन गुजराथी, शिवाजी बांदल, चेतन ढेकणे, वंदना अन्नदाते, वैशाली पवार, भावना वाल्मिकी असे सर्व सोसायटी सदस्य उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button