पिंपरी चिंचवडपुणेराजकारणसमाजकारण

आमदार महेश लांडगे यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ जाहीर !

२४ मे रोजी निगडीतील ग.दि.मा. नाट्यगृहात वितरण ; ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सन्मान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भोसरी विधानसभेचे आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पिंपरी I झुंज न्यूज : ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, रविवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती संयोजक राजन लोणकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरात सावरकर जयंतीनिमित्त जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या कार्यक्रमात ‘सावरकर समजून घेताना’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माजी सनदी अधिकारी तथा ‘चाणक्य मंडळ परिवाराचे’ प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.

निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात होणारा हा सोहळा विचार आणि कर्तृत्वाचा सुवर्णसंगम ठरणार आहे. या सोहळ्याला आणि व्याख्यानाला पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील तमाम राष्ट्रभक्तांनी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘देव, देश आणि धर्मा’साठीच्या कार्याची दखल
पुरस्काराची घोषणा करताना संयोजकांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्याच्या विविध विषयांवरील दौरे आता संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या याच ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवरील अखंड कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button