पुणे

अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची निवड

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई तथा पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड या संघाची द्विवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली.

खेड I झुंज न्यूज :  यावेळी अध्यक्ष पदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर यांची निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत एकूण २१ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून पत्रकार बांधवांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार हि निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल शिंदे तर सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भरत निगडे यांनी निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

ही निवडणूक आळंदी-मोशी रोडवरील डूडूळगाव येथील दीप बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, प्रतिनिधी एम. जी. शेलार, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संघटनेतील ज्येष्ठ मावळते अध्यक्ष अर्जुन मेदनकर व श्रीकांत बोरावके यांनी संघटनेच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेत सहमती दर्शविली. परिणामी अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर यांची निवड सर्व संमतीने बिनविरोध झाली.

यावेळी जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड, हनुमंत देवकर, माजी अध्यक्ष हरिदास कड, देवानंद गोरडवार, मिनिनाथ मेमाणे, कल्पेश भोई आदी उपस्थित होतें.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : श्रीकांत बारावके
कार्याध्यक्ष : अर्जुन मेदनकर
सचिव : विवेक बच्चे
उपाध्यक्ष : गोविंद ठाकूर, गौतम पाटोळे, संजय बोरकर, अविनाश राळे.
सहसचिव : रोहिदास कदम
खजिनदार : योगेश गायकवाड
सहखजिनदार : सुनिल बटवाल
प्रसिद्धी प्रमुख : अनिल जोगदंड
कार्यकारिणी सदस्य : प्रसन्नकुमार देवकर, आतिश मेटे, बद्रीनाथ घुगे, सोमनाथ बेंडाले, कृष्णा आवटे, योगेश जाधव , बाबासाहेब भंडारे, राजेश नागरे, भागवत काटकर, प्रमोद भळगट यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button