
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्र. ६(ब) मधील अपक्ष उमेदवार प्रसाद सुभाष बोराटे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आज दिसून आले.गेल्या काही आठवड्यांपासून प्रभागातील प्रत्येक वस्ती,रस्ता आणि चौकात जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

आळंदी । झुंज न्यूज : प्रसाद बोराटे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रभागात सक्रिय असून स्वच्छता,रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा,इंद्रायणी नदी प्रदूषण, बससेवा, स्मशानभूमी सुधारणा, महिला सुरक्षा अशा स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे नागरिकांचे मत आहे. निवडून आल्यास “कामाला गती आणि विकासाला प्राधान्य” देण्याचा विश्वास त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिला आहे.

प्रचाराची कोणतीही दिमाखदार मिरवणूक न करता,हातात चिन्हाचे शिट्टी वाजवणारे प्रतिक आणि साधे नियोजन घेऊन घराघरांत भेट देण्याची त्यांची धडपड मतदारांना वेगळी जाणवत आहे.युवक,महिला आणि जेष्ठ नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आज दिवसभर आणि उद्या संध्याकाळपर्यंत नागरिकांशी संवाद साधून विकासाची रूपरेषा समजावून सांगण्याचे नियोजन प्रसाद बोराटे यांनी केले आहे.



